गणेशमूर्ती कॉपीराइट उल्लंघन प्रकरणात 'PARIONSTR'ला मोठे यश; मा. न्यायालयाकडून अंतरिम मनाईहुकूम

 


गणेशमूर्ती कॉपीराइट उल्लंघन प्रकरणात 'PARIONSTR'ला मोठे यश; मा. न्यायालयाकडून अंतरिम मनाईहुकूम

अलिबाग-रायगड: मूळ आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीच्या डिझाइनचे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या प्रतिवादीविरोधात दाखल केलेल्या कॉपीराइट उल्लंघन दाव्यात 'पॅरिऑनस्ट्र' (Parionstr) या विधी सल्लागार संस्थेने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील कागदपत्रे आणि पुराव्यांची पडताळणी करून प्रतिवादीला गणेशमूर्तींच्या अनधिकृत उत्पादनावर आणि विक्रीवर तात्पुरती बंदी घालत अंतरिम मनाईहुकूम (Injunction) मंजूर केला आहे.

मूळ मूर्तिकार/वादी यांनी तयार केलेल्या विशिष्ट गणेशमूर्तीच्या कलाकृतीची विनापरवाना हुबेहूब नक्कल करून प्रतिवादीकडून बाजारात प्रचंड प्रमाणात उत्पादन व विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले होते. सणासुदीच्या काळात झालेल्या या अनधिकृत उत्पादनामुळे मूळ कलाकाराचे प्रचंड व्यावसायिक आणि आर्थिक नुकसान होत होते.

न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर बाजू

या व्यावसायिक व कलात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी वादीतर्फे मा. न्यायालयात कॉपीराइट कायदा, १९५७ (Copyright Act), दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) आणि विनिर्दिष्ट अनुतोष कायदा, १९६३ (Specific Relief Act) अंतर्गत दाद मागण्यात आली.

या खटल्यात कायदेशीर बाजू मांडणाऱ्या विधिज्ञ  ॲड. परिमल बांबेरे, ॲड. आदेश घाटपांडे आणि प्रशांत बांबेरे (विधी प्रशिक्षणार्थी / Legal Intern) यांचा समावेश होता.

न्यायालयात युक्तिवाद करताना विधिज्ञ यांनी  महत्त्वपूर्ण कागदपत्रे, मूळ डिझाइनचे पुरावे आणि प्रतिवादीकडून होत असलेल्या हुबेहूब नक्कलेचे दाखले सादर केले. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या:

  • कलाकृतीचे मूळ स्वामित्व: गणेशमूर्तीची संकल्पना आणि मूळ डिझाइन वादींचेच असल्याचे सिद्ध करणारे आवश्यक दस्तऐवज.

  • डिझाइनमधील साम्य: प्रतिवादीने व्यावसायिक नफ्यासाठी मूळ कलाकृतीची केलेली अनधिकृत नक्कल.

  • आर्थिक नुकसान: अनधिकृत मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे मूळ निर्मात्याचे झालेले थेट व्यावसायिक नुकसान.

न्यायालयाचा निर्णय

सादर केलेली कागदपत्रे आणि वस्तुस्थिती विचारात घेऊन मा.न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ३९, नियम १ व २ तसेच विशेष मुख्यतः कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिवादीला तात्काळ अंतरिम मनाईहुकूम जारी केला.

या निर्णयामुळे प्रतिवादीला संबंधित वादग्रस्त गणेशमूर्तींचे पुढील साचेकाम, उत्पादन, विपणन आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कलाकारांच्या आणि मूर्तिकारांच्या मूळ कलाकृतींचे व्यावसायिक पायरसीपासून संरक्षण करण्यासाठी हा निकाल अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा