मुंबई उच्च न्यायालयात कोणते प्रकरणे चालतात?

Image Created with AI by Parimal Bambere


मुंबई उच्च न्यायालयात कोणते प्रकरणे चालतात?

वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयात अनेक प्रकारचे केसेस / दावे चालतात परंतु आपण मुंबई उच्च न्यायालयात काही मर्यादित दावे चालवतो.

आपली जी 'Parionstr Law फर्म ' आहे ती फक्त मुंबई, कोल्हापूर व औरंगाबाद याठिकाणीच काम पाहते. त्यात प्रामुख्याने जे जिल्हा न्यायालयातून अपील दिवाणी व फौजदारी दोन्ही पण. त्यात काही ट्रेड, IP, रिट असे ओरिजिनल जुरीडिक्शन मधील मॅटर चे काम आपण पाहतो.


बहुदा आपल्याला जेव्हा जिल्हा कोर्टातून दिवाणी अथवा फौजदारी मधील निर्णय मान्य नसतो तेव्हा आपण उच्च न्यायालयात धाव घेतो अपील साठी. तसेच जेव्हा काही ठराविक मुद्दे असतात जिथे आपण अपील करू शकत नाही तेव्हा देखील आपण रिट मध्ये अँप्लिकेशन करून शकतो.


मुंबई उच्च न्यायालया साठी विभागानुसार खालीलप्रमाणे :

मुंबई उच्च न्यायालय (मुंबई ): जिल्हे मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, पालघर, पुणे, रायगड, ठाणे, दादर & नगर हवेली, दमण, दिऊ.
मुंबई उच्च न्यायालय (औरंगाबाद ): जिल्हे अहमदनगर, औरंगाबाद, बीड, धुळे, जालना, जळगाव, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नंदुरबार.
मुंबई उच्च न्यायालय (नागपूर ): जिल्हे नागपूर, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंडीया, गडचिरोली, वाशीम.
मुंबई उच्च न्यायालय (गोवा ): जिल्हे नॉर्थ गोवा (पणजी ), साऊथ गोवा (मार्गो).
मुंबई उच्च न्यायालय (कोल्हापूर ): 
जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


अश्या प्रकारे जिल्हानिहाय अपील करू शकतो.

तसेच यात खूप काही माहिती मी पुढील लेखात सांगेल.

ॲड. परिमल भा. बांबेरे.
जिल्हा व सत्र न्यायालय, संगमनेर.
९३०७७९४६४६
टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा